Swarathramani | स्वरार्थरमणी

Swarathramani | स्वरार्थरमणी
कुठल्याही दोन अस्तित्वांमधील संबंधाचे प्रतीक म्हणजे 'भाषा!' विश्वांतर्गत असलेल्या प्रत्येक अस्तित्वाचे एकमेकांशी अतूट असे एक नाते असते. म्हणून देहाचा आत्म्याशी किंवा इतरेतरांशी असलेल्या या नात्याला किंवा संबंधाला प्रस्थापित करणारे किंवा प्रकट करणारे जे माध्यम, ते म्हणजे 'भाषा!' या भाषेच्या माध्यमातून जे घडते, तो 'संवाद' असतो. या संवादातूनच भाषेची ओळख होत असते. हा संवाद जसा बोलका असतो, तसाच तो मूकही असतो, स्वगतही असतो. हा संवाद ज्या भाषेतून घडतो, त्याला 'माध्यम' म्हणणे उचित ठरेल. "स्वरभाषा हेही एक 'माध्यम' असल्याने या माध्यमातही पूर्णत्वाप्रत जाण्याची शक्ती असलीच पाहिजे. या पूर्णत्वाला आपण 'मोक्ष' असेही म्हणतो शाश्वत शांती म्हणूनही ओळखतो. या शांतीप्रत जाण्याचा प्रयत्न करणे यालाच 'अध्यात्ममार्ग' अनुसरणे असे म्हटले जाते आणि म्हणून स्वरभाषेतूनही अध्यात्म साध्य कसे होईल म्हणजेच आत्मप्रचीती कशी येईल याचा विचार करणे आणि तदनुसार कृती करत राहणे. यातूनच स्वरमाध्यमाचा पूर्ण तर्हेने अभ्यास होत असतो."