Swarsagar |स्वरसागर

Swarsagar |स्वरसागर
आपल्या लाडक्या गायकांच्या स्वरात चिंब भिजून लाखो कोट्यवधी श्रोत्यांनी आयुष्याला नवा रंग दिला, आयुष्यातील अनेक क्षण सजवले, सजीव केले. असंख्य गायकांच्या स्वरांतून उभ राहिलेल हिंदी चित्रपट संगीताच विश्व कुठल्याही अदभूतापेक्षा कमी नाही! भारतीय श्रोत्यांची प्रत्येक पिढी स्वरांच्या या दुनियेशी जोडली गेली आहे. गायक कलाकारांचे स्वर त्यांच्यासाठी जीवनाच्या वाटेवर मिळालेली अमूल्य साथ ठरली. "स्वरसागर मध्ये याच स्वरांची झळाळणारी रत्न आहेत स्मरणविश्वात कायम ठाण मांडून बसलेले गायक आहेत विस्मृतीत गेलेले गायक कलाकार आहेत.. कालचे गायक आहेत आणि आजचेही! स्वरसागरच्या निमित्ताने अनेक गायकांच्या गानप्रवासाचा पट उलगडला गेला आहे. स्वरसागराच्या लाटांचा हा नाद हिंदी चित्रपट संगीताच्या चाहत्यांच्या मनातलाच नाद होय!.."