Swayamvikasachi Swayamprerana | स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा

Swayamvikasachi Swayamprerana | स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा
या जगातील ८० टक्के लोक सामान्य आणि स्वतःच्या मर्जीविरुद्ध जीवन जगतात, तर फक्त २० टक्के लोक आपल्या मनाप्रमाणे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगतात. जगातील ८० टक्के संपत्ती फक्त २० टक्के लोकांच्या हातात सामावलेली आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, की या आनंदी, कर्तृत्ववान, यशस्वी अशा या २० टक्के लोकांमध्ये आपण का नाही? या २० टक्के लोकांना स्वयंविकास कसा करावा, प्रेरित कसे राहावे, हे समजलेले असते. स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा कशी ज्वलंत ठेवावी, हे त्यांना माहीत असते. हे जे या २० टक्के लोकांना कळले, उमजले, समजले, तेच या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. "व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे हे वेगवेगळ्या अनुभवांतून उदाहरणांतून प्रसंगांतून आणि कथांतून या पुस्तकात सांगितले आहे. निखळ व्यक्तिमत्व विकासावर केंद्रित न करता संपूर्ण संर्वांगीण मानवी स्वयंविकासावर या पुस्तकात भाष्य केले आहे."