Sycroscope | सायक्रोस्कोप

Sycroscope | सायक्रोस्कोप
मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. सूक्ष्मदर्शकातून जे पाहिलं जातं ते त्याच्या सगळ्या बारकाव्यांसकट मोठ्या आकारात दिसतं. आपल्या मानसिक प्रक्रिया मोठ्या आकारात पाहू शकणारा एखादा मायक्रोस्कोप असला तर? असा प्रश्न एका मानसशास्त्रज्ञाला पडला व या मायक्रोस्कोपला त्यानं नाव दिलं- 'सायक्रोस्कोप', म्हणजे आपले विचार, भावना व वर्तन यांची सूक्ष्मातून पाहणी करणारा सूक्ष्मदर्शक. हा 'सायक्रोस्कोप' दृश्य नाही. त्यातून पाहणी करण्याची सवय स्वतःला जडवून घ्यावी लागते. ती जडवून घेण्यास हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. दैनंदिन जीवनात आपण अनुभवत असलेल्या अनेक मानसिक घडामोडी बारकाव्यांनिशी दाखविणारा हा सायक्रोस्कोप कसा आहे याचा प्रत्यय तुम्हांला पुस्तकातील लेख वाचताना येऊ शकेल. स्वतःच्या मानसिक व्यवहारांचं सूक्ष्म अवलोकन करण्यास तो तुम्हांला मदत करेल. आपण विकासाच्या वाटेवर आहोत की धोक्याच्या, हे तुम्हांला पडताळून पाहता येईल व त्यानुसार तुम्ही स्वतःत उचित बदल घडवून आणू शकाल व सुयोग्य आत्मव्यवस्थापन करू शकाल.