Tabalyacha Antarnad | तबल्याचा अंतर्नाद

Tabalyacha Antarnad | तबल्याचा अंतर्नाद
उस्ताद अहमद जान थिरकवा यांच्या संपर्कात आल्यापासून बापू पटवर्धन यांना तबल्याच्या अंतर्नादाविषयी आसक्ती वाटू लागली. थिरकवांच्या वादनतंत्राचा अभ्यास करताना काही गायकी तत्त्वांची अनुभूती लेखकाला झाली. तबला फक्त वाजत नाही तर गातो हेही जाणवले. कुठल्याही तालवाद्यात गणिताला प्राधान्य दिले जाते. उस्ताद थिरकवांचे वादनतंत्र ताल आणि तबल्यामधील स्वरभाव या दोहोंना समभाग देणारे आहे, हे लेखकाच्या लक्षात आले. तबल्याच्या साहित्यातील बोल बोलके बनवण्याची कला थिरकवांना साधली होती. अशा बोलक्या वादनतंत्रामुळे तबलाप्रेमिंना आणि संगीतप्रेमींनाही त्यांनी संमोहित केले. हे वादनतंत्र साधण्यासाठी त्यांनी कोणत्या संकल्पना आणि परिवर्तन साधले यावर या पुस्तकामध्ये लेखकाने प्रकाश टाकला आहे.