Tamaso Ma... | तमसो मा ...

Tamaso Ma... | तमसो मा ...
काळ बदलतो तशी माणसे बदलतात, त्यांचे जीवनमान बदलते, प्रश्नही बदलतात. या प्रश्नांच्या उत्तरांत बदलत्या काळाची प्रतिबिंबे असतात. कुरूलकर यांच्या संवेदनशील लेखणीला ती दिसतात. ती न्याहाळता-न्याहाळता त्यांची कथा आकार घेते. ती शब्दरूप घेत असताना स्वत: प्रश्नांच्या भोवर्यात प्रवेश करते आणि वाचकालाही अलगद त्यात ओढून नेते. तो नकळत त्यात गुंतत जातो ...माणसाच्या आसपासचा समाज, परिस्थिती, अवकाश त्याला चार भिंतींत कोंडू पाहत असतानाही कुरूलकरांच्या कथेतील पात्रे आशादायी निळाईचा ध्यास धरताना दिसतात. त्यांची ही झुंज नुसती वाचण्यासारखी नसते, तर जगण्याचा अर्थ उलगडू पाहणारी असते ...