Tantotant - Julvun Ghetana | तंतोतंत - जुळवून घेताना

Tantotant - Julvun Ghetana | तंतोतंत - जुळवून घेताना
कोणतीही दोन माणसे, मग ते नवरा-बायको असोत, पालक-मुले असोत, बहिण-भावंडे असोत, मित्र-मैत्रिणी असोत, अगदी जुळी भावंडे असोत, प्रत्येकजण वृत्ती, स्वभाव, आवडी-निवडीने वेगळा असतो. त्यामुळे तंतोतंत कुणीच जुळत नाही. त्यासाठी जीवनात आपल्याला सतत तडजोड करावी लागते. दोन व्यक्तींमध्ये जितकी जास्त तडजोड वृत्ती, जितका जास्त एकमेकांना प्रतिसाद, तितका अधिक सुसंवाद. एकमेकांशी जुळवून घेत असताना तंतोतंतपणा यावा असा प्रयत्न व्यक्ती करत असते. त्यातूनच जीवन सुलभ होते. याच मुद्द्यांशी संबंधित लेख या पुस्तकात वाचायला मिळतील. यातला प्रत्येक लेख वेगवेगळ्या विषयांवरचा आहे. तरीही, तो आपल्या जगण्याशी अत्यंत जवळचा आहे. आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी कुठे महत्त्वाच्या आहेत आणि कुठे अनावश्यक आहेत, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून होईल.