Taptapadi | तप्तपदी

V. P. Kale | व. पु. काळे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Taptapadi ( तप्तपदी ) by V. P. Kale ( व. पु. काळे )

Taptapadi | तप्तपदी

About The Book
Book Details
Book Reviews

लग्न विधीतल्या सप्तपदीबरोबर सुखाच्या सहस्त्र्पदांची स्वप्ने पाहत स्त्री प्रपंचात पाऊल टाकते. त्यावेळी अनेक संमिश्र भावनांनी तिचे मन वेढलेले असते. नव्या नवलाईचं अप्रुप, नवीन वातावरणं, नवीन माणसं याचं अनामिक दडपण आणि सार्‍या आयुष्याचाच ट्रॅक बदलणारी महत्वाची घडामोड - नव्यानवलाईत डोळ्यासमोरच्या सहजीवनाबद्दलच्या स्वप्नांच्या धुंदीत पावलांखालची जमीन कशी आहे हे कित्येकदा समजत नाही. सुखाच्या अनुभवातला आभास हळूहळू जाणवू लागतो जीवनाचे संसाराचे बोचणारे जखमा करणारे रूप उलगडू लागते. संसारातील अशा तप्तमुद्रांच्या कथा या संग्रहात वपुंनी रेखाटल्या आहेत. अनेकजणी या तप्तपदीवरून अखंडपणे चालत आहेत. संसारात सर्वार्थानं सूर जुळणे अशक्यच. पण नवरा जर 'सखा’ असेल तर पाऊलवाट फुलांच्या पायघड्यांची बनते. तसे नसेल तर जखमा करणारा काटेरी रस्ता. अवघड वाट अशीच शक्यता निर्माण झालेल्या संसाराच्या कथा खास वपु शैलीत.

ISBN: 978-8-17-766688-5
Author Name: V. P. Kale | व. पु. काळे
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 164
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products