Tas Vaje Zanana | तास वाजे झणाणा

Ahmat Hamdi Tanpinar | अहमत हमदी तानपिनार
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Tas Vaje Zanana ( तास वाजे झणाणा ) by Ahmat Hamdi Tanpinar ( अहमत हमदी तानपिनार )

Tas Vaje Zanana | तास वाजे झणाणा

About The Book
Book Details
Book Reviews

तुर्की भाषेतील प्रतितयश ज्येष्ठ लेखक अहमत हमदी तानपिनार यांच्या मूळ ‘सतलेरी आयार्लामा इन्स्टिट्युत्सू’ या गाजलेल्या कादंबरीचा जयश्री हरि जोशी यांनी केलेला ‘तास वाजे झणाणा’ हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद वाचकाला विचारमग्न करतो.आधुनिक काळाच्या गतीशी आणि पाश्चिमात्य जीवनपद्धतीशी जमवून न घेता आलेल्या सामान्य माणसाच्या हतबलतेबद्दल नर्मविनोदी भाष्य करत कथानायकाची व्यथा या कादंबरीतून तानपिनार यांनी मांडली आहे. माणसाच्या दुबळ्या आयुष्याबद्दल बोचरा उपहास व्यक्त करणारी या कादंबरीची शैलीही खुमासदार, रोचक आणि खोचक उपरोधाच्या अंगाने जाणारी आहे. इस्लामी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या भारतीय समाजाला पूर्ण अपरिचित असलेल्या या तुर्की कादंबरीतून संस्कृतीचे शेकडो संदर्भ सापडतात. तिथल्या समाजजीवनाचे, सामान्य माणसाचे प्रतिबिंब तानपिनार यांच्या या लोकप्रिय कादंबरीत पडलेले दिसते.

ISBN: 978-8-17-185328-1
Author Name: Ahmat Hamdi Tanpinar | अहमत हमदी तानपिनार
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: Jayashri Hari Joshi ( जयश्री हरि जोशी )
Binding: Paperback
Pages: 289
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products