Tatya Urf Ramchandra Pandurang Tope | तात्या उर्फ रामचंद्र पांडुरंग टोपे
Tatya Urf Ramchandra Pandurang Tope | तात्या उर्फ रामचंद्र पांडुरंग टोपे
स्वदेशासाठी झटणे, झगडणे, लढणे, मनापासून लढणे म्हणजे काय हे तात्या उर्फ रामचंद्र पांडुरंग टोपे या १८५७ च्या एका खंद्या सेनानीकडे पाहुन, त्यांचे चरित्र वाचूनच कळेल. त्यांचे मूळ संपूर्ण नांव 'रामचंद्र पांडुरंग भट-येवलेकर' असे होते. ते श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीत फडावर प्रमुख व्यवहारपंडित होते. सुमारे ३० वर्षे तोफखान्यावर अनेक ठिकाणी संस्थानातून काम केल्यानंतर पहिल्या बाजीरावांनी त्यांचे कर्तृत्व बघून एक खाशी टोपी बहाल केली. ती इतकी मौल्यवान आणि रत्नहिऱ्यांनी मढवलेली होती आणि त्यामुळेच त्यांचे नाव ‘टोपे' असे रूढ झाले.