Te Ani Mi | ते आणि मी

Shakuntala Punde | शकुंतला पुंडे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Te Ani Mi ( ते आणि मी ) by Shakuntala Punde ( शकुंतला पुंडे )

Te Ani Mi | ते आणि मी

About The Book
Book Details
Book Reviews

हे शकुंतला पुंडे ह्यांचं एक अनोखा अविष्कार असणारं आगळंवेगळं ललित पुस्तक. या पुस्तकातल्या 'ते'शी लेखिकेचं एक भावनिक नातं तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे. ते नातं इतकं उत्कट, मधुर अन जिवाभावाचं झालेलं आहे की, कोकणातला मुक्त, घनदाट, विस्तीर्ण निसर्ग असो वा शहरातल्या घराच्या गॅलरीतला बंदिस्त मंच किंवा गॅलरीबाहेरचा 'हिरवा रंगमंच' असो, हे नातं जणू तिच्या जगण्याचाच एक धागा होऊन जातं. 'ते' आणि लेखिका यांचं जगणं एकमेकांत गुंतलेलं, एकमेकांशी बांधलेलं, जणू सलग घट्ट वीण असलेल्या रेशमी वस्त्रासारखंच कसं होऊन जातं याचं एक मनोज्ञ दर्शन या पुस्तकात सर्वत्र, सतत घडत राहतं.आपल्या बालपणापासून आजपर्यंत 'ते'शी अलगद जुळत गेलेले भावबंध लेखिकेने सरळसाध्या तरीही वेधक अशा शैलीत मांडलेले आहेत. त्यामुळे वाचकही स्वत:च्या नकळत लेखिकेच्या आनंदविश्वाचा वाटेकरी होतो. 'ते' आणि मी हे पुस्तक वाचणं म्हणजे निखळ आनंदाचा अनुभव आहे अन् निखळ अनुभवाचा आनंदही आहे!

ISBN: 978-9-38-259163-4
Author Name: Shakuntala Punde | शकुंतला पुंडे
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 195
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products