Thank You | थँक यू

Thank You | थँक यू
शिरीष कणेकर बहुआयामी-बहुपेडी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पत्रकार, चित्रपट व क्रिकेट समिक्षक, ललित लेखक, एकपात्री कलाकार अशा एकाहून अनेक कलागुणांचा दुर्मिळ असा मिलाफ होता. कणेकरांच्या हजरजबाबी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे ते जिथे जिथे जातील तिथे हास्याची लकेर उमटत असे. चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांतील अनेक घडामोडींचा त्यांचा बारकाईने अभ्यास असे. विसंगती आणि किश्श्यांतून ते हास्याची कारंजी फुलवत राहिले. त्यांनी स्वतःला कुठल्याही क्षेत्राचे बंधन घालून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी अष्टपैलू खेळाडूसारखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मैदानात कामगिरी करून ठेवली आहे. --- मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे