The Golden Age | द गोल्डन एज

The Golden Age | द गोल्डन एज
या कादंबरीचे नायक नायिका आहेत फ्रॅंक आणि एल्सा द गोल्डन एज या पोलिओग्रस्त मुलांवर उपचार करणार्या ऑस्ट्रेलियातील संस्थेत या दोघांची भेट होते आणि ते परस्परांच्या प्रेमात पडतात. मेयेर आणि इडा हे फ्रॅंकचे आई वडील जॅक आणि मार्गारेट हे एल्साचे आई वडील यांच्यासह या संस्थेतील परिचारिका लिद्जा ऑलिव्ह तसेच या संस्थेत राहणारी मुलं इ. यांचंही जीवन त्यांच्या व्यक्तिरेखांसह या कादंबरीतून उलगडतं. पोलिओग्रस्त मुलांना उपचारांबरोबर सकारात्मकता देणारी ही संस्था आहे. एका परिचारिकेला एकदा फ्रॅंक आणि एल्सा एका अंथरुणात नको त्या अवस्थेत सापडतात. मग त्या दोघांना संस्थेतून काढून टाकल्यामुळे ते आपापल्या घरी परत येतात पण एकमेकांसाठी झुरत राहतात. इडा मार्गारेटशी संपर्क साधून फ्रॅंक आणि मेअरसह एल्साच्या घरी जाते. एल्सा आणि फ्रॅंकची भेट होते. अतिशय साध्या कथानकातून उच्च भावनिक स्तरावरचा आनंद देणारी कादंबरी.