The Inheritance Of Loss | दि इन्हेरिटन्स ऑफ लॉस

The Inheritance Of Loss | दि इन्हेरिटन्स ऑफ लॉस
किरण देसाई या भारतीय लेखिकेच्या 'दि इन्हेरिटन्स ऑफ लॉस' या दुसर्याच पुस्तकाला तीन वर्षांपूर्वी प्रतिष्ठेचे 'मॅन बुकर' पारितोषिक मिळालं आणि एतद्देएशीय लेखकांनी साहेबाच्या जगात आपले पाय किती भक्कमपणे रोवले आहेत, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. या घाणेरड्या जगात न्यायदान करणं अशक्य झालेले न्यायाधीश निवृत्तीनंतर कांचनगंगा शिखराच्या पायथ्याशी वास्तव्याला येतात. त्यांची पोरकी नात, त्यांचा खानसामा आणि या नातीचा नेपाळी प्रियकर यांची ही कहाणी. वसाहतवादाचे परिणाम आणि धर्म, वंश व राष्ट्रीयत्व यांच्यातील संघर्ष आणि समाजात उफाळलेला हिंसाचार यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. एका अर्थाने हा सुखाच्या शोधासाठी चाललेला संघर्षही या कादंबरी मध्ये आहे.