The Krishna Key | द कृष्णा की

The Krishna Key | द कृष्णा की
चार मुद्रा आणि एक तबकडी, ज्यांचं ऐतिहासिक महत्त्व आहे, ज्यांना पौराणिक पार्श्वभूमी आहे, अशी प्रत्येकी एक मुद्रा चार चार मित्रांकडे आहे – प्रा. रवी मोहन सैनी, संशोधक निखिल भोजराज, अणुसंशोधक प्रा. राजाराम कुरकुडे, आनुवंशशास्त्रज्ञ देवेंद्र छेदी. त्या मुद्रांसाठी अनिल वर्षनेचा होतो खून. आळ येतो सैनीवर. सैनी आणि त्याची विद्यार्थिनी प्रिया पोलिसांपासून पळत राहतात. दरम्यान, निखिल भोजराज आणि कुरकुडेंचाही खून होतो. तारक वकील हे खून करत असतो माताजींच्या सांगण्यावरून. एका धक्कादायक क्षणी प्रियाही तारकला सामील असल्याचं सत्य सैनीसमोर येतं. तारक आणि प्रिया इन्स्पेक्टर राधिकाला ओलीस ठेवतात. काय विशेष असतं त्या मुद्रांमध्ये? त्या शेवटी कुणाला मिळतात? राधिका, तारक आणि प्रियाच्या तावडीतून सुटते का? महाभारत आणि कृष्णचरित्रातील प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर अनेकानेक नाट्यमय वळणांनी पुढे सरकत राहणारी आणि श्वास रोधून ठेवायला लावणारी उत्कंठावर्धक कादंबरी.