The Magic of Believing | द मॅजिक ऑफ बिलिव्हिंग

The Magic of Believing | द मॅजिक ऑफ बिलिव्हिंग
आपल्या मनातील ध्येय साध्य करण्याच्या दिशेने मार्ग दाखवण्याचे काम विश्वास करतो. त्याचबरोबर आपण ध्येय नक्की गाठू, याची खात्रीदेखील त्या विचारावरील विश्वासामुळेच मनात स्थिर होत असते.आपले स्वतःचे वर्तन बदलायचे असेल, तर आपल्याला स्वतःच्या मनातील विश्वासापासून सुरुवात करावी लागते. उत्कृष्ट ध्येय, उत्कृष्ट समर्पित वर्तन, उत्कृष्ट निष्पत्ती यांचे मॉडेलिंग करायचे असेल, तर आपल्याला आपल्या मनात विश्वासाचे मॉडेल तयार करावे लागेल. "मनात दृढ विश्वास असला की हातून उत्कृष्ट कार्य घडू शकते. हा विश्वास तुमच्या मज्जासंस्थेला थेट आज्ञा देतो. एखादा विचार खरा किंवा योग्य असल्याचा विश्वास तुमच्या मनात स्थिर झाला की ती स्थिती किंवा विचार यांना अनुसरून परिस्थिती अस्तित्वात असल्याप्रमाणे तुमचे वर्तन आपोआप होऊ लागते."