The Miracle Morning | द मिरॅकल मॉर्निंग

The Miracle Morning | द मिरॅकल मॉर्निंग
जन्माला येणाऱ्यांच्या जीवनात मृत्यू अटळ असतो; पण म्हणून त्याचे दुःख न करता ते समजावून घेत जीवनात आनंद शोधायला शिकले पाहिजे, असा सल्ला हॅल एलरॉड यांनी ‘द मिरॅकल मॉर्निंग’मधून दिला आहे. पहाटेच्या जीवनशैलीने सकारात्मक बदल कसा करावा, याबद्दल त्यांनी या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे. जीवघेण्या अपघातात संपूर्ण शरीर जायबंदी झाले, तरी हॅल एलरॉड यांनी मनोबलाच्या जोरावर पुन्हा काम सुरू केले. त्यानंतर पुन्हा जीवनाची गाडी उतारावर लागली, तेव्हा त्यांच्या मित्राने पहाटे उठून धावण्याचा मंत्र दिला. त्यातून जीवनात झालेल्या परिवर्तनामुळे लेखकाने व्यक्तिविकासाची ‘द मिरॅकल मॉर्निंग’ ही आगळी पद्धत तयार केली. पहाटे उठून सहा सवयी (SAVERS) आचरणात आणल्यास अनेक गोष्टी कशा साध्य होऊ शकतात, याबद्दल लेखकाने या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. नैराश्यावर मात करणे, सामान्यत्वाकडून असामान्यतेकडे वाटचाल, व्यक्तिमत्त्व विकास, ध्येय-स्वप्ने साध्य करणे हे पहाटेच्या जीवनशैलीने कसे शक्य आहे, हे यातून समजते. पहाटेच्या सहा मिनिटांतील वास्तवाभिमुखतेबद्दलही या पुस्तकात टिप्स दिल्या आहेत.