The Theatre of the Absurd |द थिएटर ऑफ द अँब्सर्ड

The Theatre of the Absurd |द थिएटर ऑफ द अँब्सर्ड
द थिएटर ऑफ द अँब्सर्ड ' ही मिथ्यावादाची नाट्यभिव्यक्ती आहे . खरे म्हणजे ही मार्टीन एस्लीनने अल्बेर कामूंच्या मिथ्यावादावर ही संकल्पना उभी केली . पण ' द थिएटर ऑफ द अँब्सर्ड ' ही कुठलीही सुसंघटित चळवळ नव्हती , संघटना नव्हती की वादासाठी जन्मास आलेली सुनियोजित स्कूलही नव्हती . बेकेट,आयनेस्को यांनी मिथ्यावादासंबंधी मांडलेली अनुभूतीवर मते ,त्याच्या नाट्यभिव्यक्तीचे स्वरूप तसेच पिंटर,ऑडमोव्ह, आल्बी, जेनेट ,रोझोविच,ग्रास,मोर्झेक,हॉवेल आणि इतर अब्सड्रीस्ट नाटककारांच्या नाट्यकृतींचे स्वरूप,त्यातला आशय ,अविष्कारपद्धती यातले साम्य हेरून मार्टीन एस्लीनने त्यांना ' द थिएटर ऑफ द अँब्सर्ड ' या एक सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. मिथ्यावादाची वैशिष्ट्ये,घटक,लक्षणे आदींचीच अभिव्यक्ती , "आशयाशी एकरूपता साधणाऱ्या अविष्कारपद्धतीतून या नाटककारांनी केली. शिवाय त्यांनी घेतलेल्या मिथ्यावस्थेच्या मिथ्यावृत्तीच्या प्रामाणिक अनुभवांना " "अनुभूतींना त्यांनी या अविष्कारपध्दतीतून अभिव्यक्त केले. या अनुभूती अनुभव देशकाल वातावरण वेगवेगळे असले तरी अनुभवांचे केंद्र एकच होते ते म्हणजे मानवी मन मानवी अस्तित्व या अस्तित्वाच्या अनुषंगाने मिथ्यावादी प्रवृत्ती-प्रमेयांना आपसूकच त्यांच्या नाट्याभिव्यक्तीत अपरिहार्यपणे स्थान मिळाले. "