The Three Musketeers | द थ्री मस्कटिअर्स

The Three Musketeers | द थ्री मस्कटिअर्स
विख्यात कादंबरीकार आलेक्झान्द्र द्यूमासलिखित ‘द थ्री मस्कटिअर्स’ या रोमांचक, नाट्यमय कादंबरीचा मराठी अनुवाद ! रहस्य, षड्यंत्र, थरार, विस्मयकारक घटना, तलवारबाजीच्या अखंड करामती, प्रेमप्रकरणं, गनिमी छापे, जिवानिशी झालेल्या सुटका आणि बेफाम साहसं असा सगळा ऐवज या अजरामर कादंबरीमध्ये पानोपानी वाचायला मिळतो ! द्यूमासने साकारलेल्या या कादंबरीतल्या जगात अशक्य काहीच नाही. तसंच सगळं काही भव्यदिव्य आहे! त्या काळातली राजकीय समीकरणं आणि परिस्थिती यांच्या गुंफणीतून आकाराला आलेली, कधीही संपू नये असं वाटायला लावणारी एक अभिजात कादंबरी खास ‘वर्ल्ड क्लासिक्स सीरिजमधून’ वाचकांच्या भेटीला आली आहे !