Tin Sampadakanchya Mulakhati | तीन संपादकांच्या मुलाखती

Tin Sampadakanchya Mulakhati | तीन संपादकांच्या मुलाखती
एन. राम सांगत आहेत 145 वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’ या दैनिकाच्या वाटचालीबद्दल. "शेखर गुप्ता सांगत आहेत ‘द इंडियन एक्सप्रेस’ ‘इंडिया टुडे’ आणि ‘द प्रिंट’ येथील स्वतःच्या कारकिर्दीबद्दल." नरेश फर्नांडिस सांगत आहेत ‘स्क्रोल’ या डिजिटल पोर्टलवरील संपादनाबाबत… "हे तिन्ही संपादक इंग्रजी पत्रकारितेत आहेत देशाच्या तीन टोकांवरील तीन महानगरांत (चेन्नई दिल्ली मुंबई) राहून तिघांनी पत्रकारिता केली आहे. तिघे तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील आहेत तिघांनीही पूर्णतः वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केले आहे तिघांच्याही दृष्टीकोनांत फरक आहे तिघांनीही पत्रकारिता गांभीर्याने केलेली आहे आणि तिघांचीही पत्रकारितेच्या मूल्यांशी असलेली बांधिलकी पक्की आहे."