Tingad | तिंगाड

Mahadeo More | महादेव मोरे
Regular price Rs. 234.00
Sale price Rs. 234.00 Regular price Rs. 260.00
Unit price
Tingad ( तिंगाड ) by Mahadeo More ( महादेव मोरे )

Tingad | तिंगाड

About The Book
Book Details
Book Reviews

‘तिंगाड’ कथेत गावातली पूरस्थिती बघायला येतात पालकमंत्री...अन् तेच पडतात पाण्यात...तर ‘वैकुंठ’ कथेतील निगवणी गावात होते नवीन स्मशानभूमी आणि वाहून जाते पाण्यात...नगरपालिकेत तेव्हा रंगलेली असते हाणामारी... ‘जाळं’ या कथेत ब्ल्यू फिल्म चाललेली असताना पोलीस छापा टाकतात आणि स्वत:च ब्ल्यू फिल्म बघत बसतात...‘हुमान’ कथेत आहे काळ्या बाप्या आणि लंबू तुक्या या इरसाल जोडीचा ‘खास’ भाषेतील हंगामा... ‘गस्त’मध्ये गावात सुरू होतं चोर्‍यांचं सत्र, रामा थोरवतसह गावकरी घालायला लागतात गस्त...गस्तीदरम्यान दारू पितात...चोरांना मिळतं मोकळं रान...‘इलेक्शन’मधील तथाकथित वार्ताहर हणमंत देशमुख आणि गुंडू न्हाव्याची निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची ‘मज्जा’ आणि त्यांच्या पारवाळांची झालेली चांदी...‘शिकार’मधील धोंडबा ड्रायव्हरचा मालक जातो शिकारीला अन् घाबरतो वाघाला, धोंडबाच मग वाघाला अर्धमेला करतो, मग मालक वाघावर गोळी चालवतो...अन् नंतर कळतं की तो वाघ सर्कशीतला असतो... अस्सल गावरान पार्श्वभूमी आणि इरसाल बेनी...विनोदाची अनोखी मेजवानी

ISBN: 978-9-35-720064-6
Author Name: Mahadeo More | महादेव मोरे
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 148
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products