Tirkitadha |तिरकीटधा

Tirkitadha |तिरकीटधा
द्वारकानाथ संझगिरींच्या हिंदी चित्रपटसंगीताच्या कार्यक्रमामागे त्यांचा मोठा अभ्यास असतो. पण कार्यक्रमाला असलेल्या कालमर्यादेमुळे त्यांना तो मनासारखा श्रोत्यांपुढे मांडता येत नाही. हिंदी चित्रपटातलं पियानोचं स्थान जसं अजरामर आहे तसं पावसाचंही. हा पियानो असो किंवा पाऊस असो किंवा ओपी, एसडी, मदनमोहन, शंकर-जयकिशन यांच्यासारखे संगीतकार असोत किंवा साहीर आणि शैलेन्द्रसारखे गीतकार असोत, चित्रपटसंगीताच्या एका कार्यक्रमात कालमर्यादेमुळे उलगडून मांडता येत नाहीत. या सर्वांनी हिंदी चित्रपटसंगीत ख-या अर्थाने श्रीमंत केलं. या श्रीमंतीची मोजदाद संझगिरींच्या शैलीत करणारं हे पुस्तक.प्रत्येक छापलेल्या शब्दाला अक्षयतेचं वरदान असतं पण निवेदनाचे शब्द हवेत विरून जातात. त्या निवेदनामागच्या व्यासंगाला एक चिरंतन रूप देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.