Tisaryanda Chimanrav | तिसऱ्यांदा चिमणराव

Tisaryanda Chimanrav | तिसऱ्यांदा चिमणराव
गेली काही दशके चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊच्या जोडीने वाचकांना मनमुराद हसवले आहे. मध्यमवर्गीय, सरळमार्गी चिमणरावाचा खळाळत्या स्वच्छ झऱ्यासारखा निर्मळ विनोद कसा होता, हे नव्या पिढीनेही जाणून घ्यायला हवे.चिमणरावाच्या या पुस्तकामुळे शाब्दिक, प्रसंगनिष्ठ विनोदाचा आदर्श असलेले लेखन जुन्या - नव्या पिढीला वाचता येणार आहे. ह्याही कलावंताच्या सान्निध्यात, मी आपल्या पत्नीशी का भांडतो?, करावाचून करमणूक, हवालदाराचा जॉकी कसा झाला, वरपित्याचा घोटाळा, स्थूल विरुद्ध कृश अशा एकूण १५ कथा पुस्तकात वाचायला मिळतात.या कथांतून चिमणरावांच्या दुनियेतील सगळी पात्रे जिवंत होऊन समोर येतात. आणि दिवस प्रसन्न होतो.