Tissue Paper | टिश्यू पेपर

Ramesh Rawalkar | रमेश रावळकर
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Tissue Paper ( टिश्यू पेपर ) by Ramesh Rawalkar ( रमेश रावळकर )

Tissue Paper | टिश्यू पेपर

About The Book
Book Details
Book Reviews

परमीट रूम, बार, हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक स्वतंत्र जग असते. तिथे झगमगाट, उच्चभ्रूंचा वावर आणि अय्याशी फेर धरत असते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब, शोषित, पीडित लोक या दुनियेत स्वत:ला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. भारतासारख्या देशातील दोन वर्गांतील दरी पाहायची असेल, तर आपल्या जवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणी "काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत चित्रित केलेला आहे. शोषितांच्या जगण्याचे भयावह रूप आपल्याला या कादंबरीत वाचावयास मिळते. मराठी साहित्यात अपवादानेच चित्रित होणारे अर्थशास्त्रीय वास्तव प्रकर्षाने वाचकास टोचण्या देऊ लागते. श्रीमंत गर्भश्रीमंत उच्चमध्यमवर्ग मध्यमवर्ग सामान्य माणूस आणि अतिसामान्यांचे गूढ विश्व हा लेखक ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत आपल्यासमोर" "ठेवतो. नाचणारी-गाणारी पिणारी-पाजणारी बेहोश होणारी सांभाळणारी स्वत:ला गाडून घेऊन पुन्हा उगवणारी आणि दुसऱ्यांना जगवणारी एक जीवनेच्छा इथे प्रवाहित होताना दिसते. भाषेची परिपूर्ण जाण व्यक्तीच्या अंतर्मनाचा तळ शोधण्याची प्रचंड आकांक्षा यातून या कादंबरीचे अनुभवविश्व वाचकाला श्रीमंत करून जाते. माणूस होण्यासाठी ज्यांना ज्यांना डागण्या देणे गरजेचे आहे; त्या सर्वांना डागण्या देत कधी खोलवर जखम करत ही कादंबरी आपल्याला" "अस्सल साहित्यकृती वाचल्याचा अनुभव देते. प्रत्यक्ष जगलेले जीवनानुभव साहित्यात जसेच्या तसे ओतून एक जिवंत कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न रमेश रावळकर यांनी ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत केलेला आहे. वाचक या कलाकृतीचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री वाटते!" #NAME?

ISBN: 978-8-19-476404-5
Author Name: Ramesh Rawalkar | रमेश रावळकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 332
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products