To Uncha Manus - Satyajit Ray Jivan Ani Karya | तो उंच माणूस - सत्यजित राय जीवन आणि कार्य

To Uncha Manus - Satyajit Ray Jivan Ani Karya | तो उंच माणूस - सत्यजित राय जीवन आणि कार्य
सत्यजित राय हे केवळ एक महान चित्रपट दिग्दर्शकच नव्हते तर विसाव्या शतकाच्या सांस्कृतिक जीवनावर ज्यांचा अमिट प्रभाव पडला आहे असे विश्वमानव होते. राय हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम संगीतकार होते, बंगाली वाचकांच्या अनेक पिढ्यांना आकर्षित करून घेणारे विज्ञानकथा व गूढकथालेखक होते, मुलांच्या भावविश्वात नव्या संवेदना जागवणारे बालसाहित्यिक व साक्षेपी संपादक होते, ते उत्तम चित्रकार होते व मुद्रणाच्या क्षेत्रात देखील त्यांनी क्रांतिकारी कार्य केले होते. भारतीय सिनेमाची त्यांनी जगाला प्रथम ओळख करून दिली. "विजय पाडळकर हे गेल्या वीस वर्षांपासून या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करीत आहेत. या अभ्यासाच्या दरम्यान त्यांनी गोळा केलेल्या प्रचंड माहितीतून अनेक ग्रंथांतून लेखांतून मुलाखतींतून चित्रफितींतून सिनेमांतून व संगीताच्या सीडींमधून व नोंदींतून तयार झालेला एका महामानवाचा सर्वांगाने वेध घेण्याचा प्रयत्न करणारा भारतीय सिनेमावर प्रेम असणाऱ्या प्रत्येक रसिकाच्या व अभ्यासकाच्या संग्रही असलाच पाहिजे असा हा प्रदीर्घ ग्रंथ."