Trading In The Zone | ट्रेडिंग इन द झोन

Trading In The Zone | ट्रेडिंग इन द झोन
तुम्हाला शेअर बाजाराबद्दल भरपूर माहिती असेल! तुम्हाला कदाचित शेअर बाजारातील महत्त्वपूर्ण खेळाडू ज्ञात असतील! शेअर कधी खरेदी करावेत आणि कधी विकावेत याचे ज्ञान देखील असेल! बाजारातील स्थिती-गती नेमकेपणाने माहिती आहे, असे तुम्हाला वाटत असेल! पण तुम्हाला तुमची स्वतःची ओळख आहे का? खूप मुरलेले शेअर ट्रेडर्सदेखील काही वेळा त्यांच्या नकारात्मक विचारप्रणालीमुळे चुकीचे निर्णय घेतात. मानसिक असक्षमतेमुळे परिपूर्ण माहिती असून देखील ते त्यांच्या योजना यशस्वीरित्या राबवू शकत नाहीत. अती आत्मविश्वासामुळे ते शेअर बाजाराबद्दल चुकीच्या समजूती मनात विकसित करतात. परिणामतः मोठ्या तोट्याला ते सामोरे जातात.ट्रेडिंग इन द झोन मध्ये डग्लस, ट्रेडर्स सातत्याने फायदेशीर नसण्याची मूलभूत कारणे शोधून काढतात. ते ट्रेडर्सना खोलवर रुजलेल्या अयोग्य मानसिक सवयींवर मात करण्यास मदत करतात. डग्लस बाजारपेठेच्या मिथकांचा पर्दाफाश करतात. ट्रेडर्सना बाजारातील यादृच्छिक परिणामांच्या पलीकडे पाहण्यास, जोखमीची खरी वास्तविकता समजून घेण्यास आणि सर्व स्टॉक अनुमानांवर नियंत्रण ठेवणार्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचे मार्गदर्शन करण्यास शिकवतात. ट्रेडिंग इन द झोन बाजाराला नवीन मानसिक परिमाणाची ओळख करून देतो. अभूतपूर्व नफ्यासाठी ट्रेडिंग इन द झोनच्या शक्तीचा फायदा करून घ्या.