Tu Bhramat Ahasi Vaya | तू भ्रमत आहासी वाया

Tu Bhramat Ahasi Vaya | तू भ्रमत आहासी वाया
सहस्त्रदल कमल सूर्य किरणांनी अलगद उमलावे तसे विविध प्रसंग कलाकृतींतून उमलावे लागतात. या कादंबरीत हे कमळ संपूर्ण उमलले आहे. ऐहिक जीवनाचारातून मनप्रवृत्तीला उंच नेणारी अलगदपणे प्रशांत शांततेकडे नेणारी प्रकाशवाट उजळणारी नायिका हे या कादंबरीचे बलस्थान आणि आकर्षण केंद्र संपूर्णपणे ऐहिक यशात जीवनाची परिपूर्णता मानणार्या आजच्या मानवाचं प्रतिक म्हणजे ओंकारनाथ- या यशामागून येणारं निस्तत्व, रसहीन, आवेगहीन आयुष्य भोगणारा परंतु त्याचीही जाणीव नसणारा अशा मानवाला खर्या चैतन्याकडं, संपूर्ण आनंदाकडं बोटं धरून नेणारी ही कादंबरी वाचकालाही उत्कट प्रेमाचे आणि त्यागाचे असीम अविनाशी आनंदाचे दान देते.