Tuesdays With Morrie | ट्युजडेज विथ मॉरी

Tuesdays With Morrie | ट्युजडेज विथ मॉरी
मॉरी नावाच्या वृद्ध प्राध्यापकाला मिच अॅल्बम अनेक वर्षांनंतर भेटतात. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरं घडलेली असतात. सत्तरी ओलांडलेले मॉरी एका दुर्धर आजारामुळे बिछान्याला खिळलेले असतात. मिच अॅल्बम या वृद्ध प्राध्यापकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात; पण अॅल्बम यांनाच मॉरीकडून अनोखी जीवनदृष्टी लाभते. प्रेम, संयम, आपुलकी, कुटुंब, मृत्यू. जीवनाच्या अशा अनेक पैलूंबाबत मॉरी यांच्याकडून मिच अॅल्बमना महत्त्वाचे जीवनबोध मिळतात. दर मंगळवारी मॉरीसह त्यांचा संवाद रंगू लागतो आणि सार्वकालिक अशी जीवनमूल्यं आणि जीवनबोध मिच यांना प्राप्त होतात. या गुरू-शिष्यात रंगलेला हा संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं जीवनाचं सार्वकालिक तत्त्वज्ञान म्हणजे ट्युजडेज् विथ मॉरी हे पुस्तक!