Tumbadache Khot Part 1 & 2 | तुंबाडचे खोत खंड १ आणि २

Tumbadache Khot Part 1 & 2 | तुंबाडचे खोत खंड १ आणि २
'तुंबाडचे खोत' .मुळातच या द्विखंडी कादंबरीचा आवाकाचा प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा हा प्रदीर्घ कालखंड आहे.तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासून विद्यमान वंशजापर्यंत वा इतिहासाची व्याप्ती आहे. या चित्रविचित्र इतिहासांच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वाभावविशेष असा व्यकित आणि त्या व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्या अनेक घटना भेटत राहतात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसरी सारखी नाही. एक घटना दुसरी सारखी नाही. एकूण एक सर्वच व्यक्ती व घटना स्वभावविशेष अशी आणि काळ सव्वाशे वर्षाचा असला तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. तुंबाडच्या खोतांच्या कुलवृत्तांताची ही बखर एखाद्या रम्याद्भुत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे.