Tya Daha Varshantil Guru Datt | त्या दहा वर्षांतील गुरु दत्त

Tya Daha Varshantil Guru Datt | त्या दहा वर्षांतील गुरु दत्त
गुरू दत्त एक प्रतिभावंत, संवेदनशील कलाकार म्हणून प्रत्यक्षात कसा होता? व्यक्तिगत जीवनातलं त्याचं वर्तन, व्यवहार कसा होता? त्याच्या सृजनप्रक्रियेचा त्याच्या चित्रपटांतून धांडोळा घेता येतो. त्याच्या चित्रपटाची वैशिष्टं त्यातून आकळून येतात. त्याच्या चित्रप्रतिमा, त्यामागचा कलात्मक विचार त्यातून जाणून घेता येतो. परंतु ही सृजनप्रक्रिया नेमकी घडली कशी? या विलक्षण प्रतिभेच्या कलावंताच्या व्यक्तिगत आयुष्याचे पडसाद त्याच्या चित्रपटांतून कितपत उमटताना दिसतात? आत्महत्येच्या टोकाला जाण्याएवढं असं काय घडलं होतं त्याच्या आयुष्यात?.. या आणि अशा प्रश्नांची पूर्णपणे समाधानकारक उत्तरं अजूनही रसिकांना सापडलेली नाहीत. 'त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' या सत्या सरनलिखित पुस्तकात यातल्या बर्याच प्रश्नांची उत्तरं सापडतात. आणि त्यामुळे गुरू दत्त या नावाभोवती असलेलं गूढ बर्यापैकी उकलतं. याचं कारण हे पुस्तक साकारलंय गुरू दत्तचे अत्यंत निकटचे मित्र आणि सृजन-सहकारी अबरार अल्वी यांच्या आठवणींच्या आधारे