Udak Chalvave Yukti | उदक चालवावे युक्ती

Udak Chalvave Yukti | उदक चालवावे युक्ती
'उदक चालवावे युक्ती' हे विलासराव साळुंख्यांनी 'पाणी पंचायत' या द्वैमासिकात लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. यात निरनिराळे विषय हाताळले आहेत. त्यांच्या ग्रामीण विकासाच्या वाटचालीतील विविध अनुभव आहेत.अनेक जलसिंचन योजनांचा विकास झाला, तरीदेखील या देशात अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. असलेल्या पाण्याचा योग्य वापर झाला, तर अनेक पडिक-नापिक जमिनीतून पिकं घेता येतील, या विचाराने प्रेरित होऊन विलास साळुंखे या सुशिक्षित इंजिनीयरला कार्यप्रवण केलं.पाणी पंचायत हे विलासराव साळुंख्यांचं स्वप्न होतं. सर्वच समाजसुधारक अशा स्वप्नांना मूर्त स्वरुप देण्यासाठी अहोरात्र व्यस्त असतात. विलासरावांनी असाच पाण्याचा ध्यास घेतला होता. त्या ध्यासपर्वाचा आलेख म्हणजे- 'उदक चालवावे युक्ती'.