Udhvasta Ani Itar Ekankika: Bavlat |उध्वस्त आणि इतर एकांकिका: बावळट

Udhvasta Ani Itar Ekankika: Bavlat |उध्वस्त आणि इतर एकांकिका: बावळट
( ५ एकांकिकांचा संग्रह) : जीवनाच्या विविध क्षेत्रात मुशाफिरी करून आता निवांत क्षणी लेखनाकडे वळलेल्या मदन बंब यांचा हा पहिलाच पण आश्वासक एकांकिका संग्रह... "आयुष्यात आलेल्या अनेक अनुभवांच्या पायावर त्यांनी या एकांकिका रचल्या आहेत तर त्यांना वेगवेगळ्या स्वभावाची खर तर नमुन्याची मानस यातून स्वच्छपणे डोकावलेली आहेत... " रंजनाच्या वळणांनी जात असतानाही यातल्या काही एकांकिकांचे काही म्हणणंही आहे हि यातली फारच चांगली बाजू... "ते करत असताना अत्यंत सहज सोप्या संवादशैलीचा वापर यात होतो... कधी तिरकस नजरेनं पाहत तर कधी अंतमुर्ख होत कधी ऐकलेलं अनुभवलेलं तर कधी चिंतन करू पाहत केलेलं हे त्यांचं लेखन रंगमंचासाठी केलं जात आहे यांचं भान सोडताना दिसत नाही हे हि महत्वाचं... " "त्यांच्या लेखन प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतानाच जगण्यात कसलाही हात न राखता जीवनाच्या विविध प्रांतात घुसखोरी करणाऱ्या या लेखकाने नाट्यलेखनाच्याही सर्व बाजूंना आणि शक्यतांना भिडावे ती झींग त्यांच्यात आहे असे मनापासून म्हणावेसे वाटते..."