Udhwast | उद्ध्वस्त

Udhwast | उद्ध्वस्त
दारिद्रय, निरक्षरता, बेकारी, बिमारी, बकालपणा यांनी माणसं गंजून; वैभवाच्या शिखरांना सीमा नाही आणि दारिद्र्याच्या तळाला "अंत नाही. घर घरात राहिलेलं नाही माणूस माणसातनं हरपलाय आणि घराघरातील माऊली घराच्या तळाला गाडली जात आहे.हे वर्णन आहे लक्ष्मण माने यांनी केलेल्या आजच्या समाजस्थितीचं. त्यांना जगाविषयी कुतूहल आहे मनुष्यजीवनाविषयी आस्था व प्रेम आहे परंतू त्यांचे मान पीडलेले आहे भटक्या- विमुक्तांच्या आदिवासींच्या पददलितांच्या दुःख वेदनांनी. त्यांच्यातल्या कार्यकर्ता अशा स्थितीतही परिवर्तनाची लढाई लढू पाहात आहे आणि त्यांच्यातील लेखकाचं मन आक्रोशत आहे. 'या दुःखाला वाचा फोडता आली तर पाहावी' म्हणून त्यांनी मांडलेला हा कथांचा प्रपंच..."