Ugvati Mane | उगवती मने

Ugvati Mane | उगवती मने
कथा, कादंबरी, ललित, चिंतरनपर लेखन करणार्या आनंद यादव ह्यांचे हे वेगळेच बालानंद देणारे लेखन आहे. म्हणजे ह्या 'बालकथा'नसून बालांच्या कथा आहेत. त्या रुढार्थाने मुलांच्या गोष्टी नसल्या तरी खर्या अर्थाने मुलांच्याच गोष्टी आहेत. 'ग्रामीण'-'नागरी' असा भेदभाव येथे नसून एकूणच जीवन आणि ह्या जीवनातील मुलांचे महत्त्व ह्यात डोकावले आहे. ही मुले निष्णात असली तरी मोठ्यांनीही धडा घ्यावा अशी त्यांच्यात एक समज असते. अगदी 'सार्त्र'नेही थक्क व्हावे अशी ही समज असते. 'सार्त्रचा पुत्र' कथेत ह्याची अगदी उत्कृष्ट प्रचिती येते. ह्या संग्रहातील कथा मुलांची मने जोपासणार्या जश्या आहेत तश्याच त्या मनाच्या उसळी दाखवणार्याही आहेत म्हणूनच ह्या संग्रहाचे नाव आहे-'उगवती मने'