Urjechya Shodhat | ऊर्जेच्या शोधात

Urjechya Shodhat | ऊर्जेच्या शोधात
खरोखरच तापमान वाढत आहे का ?हवामानातल्या बदलांचे परिणाम खरोखरच घातक आहेत का? याबद्दल वैज्ञानिकांत बरेच मतभेद आहेत; पण हरितगृह परिणाम हे एक अनिष्ट वास्तव आहे, असं मानणार्याची संख्या जास्त आहे, आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय मान्यताही मिळालेली आहे. हे संकट टाळायचं असेल तर ही कुणा एकट्यादुकट्याची नाही, तर संपूर्ण मानव समाजाची जबाबदारी आहे.हे मत आहे लेखिका प्रियदर्शनी कर्वे यांचं , एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, अन् पुष्कळ काही. ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती.समाजसेवेच्या ध्यासाने पछाडलेल्या लेखिका ऊर्जेच्या शोधात या पुस्तकातून वाचकांना भेटीला येत आहे.