Vadalvara | वादळवारा
Vadalvara | वादळवारा
ही कथा आहे नानासाहेब पेशव्यांची, त्यांनी स्वतः जशी सांगितली असती तशी! बाजीराव पेशव्यांच्या या मुलाला स्वतःच्या न्याय्य पेंशनसाठी झगडावं लागलं. पण हा लढा तीव्र स्वरूप घेत घेत १८५७च्या रणसंग्रामात परिवर्तित झाला. ऐन रणभूमीत बंडखोर शिपायांचा राजा झालेल्या नानासाहेब पेशव्यांचं जीवनच या घटनाक्रमात बदलून गेलं. एक काळ त्यांनी इंग्रजी सत्तेची झोप उडवली, तर तेच पुढे त्यांनाही आत्मरक्षणासाठी नेपाळ ते मक्केपर्यंत पायपीट करावी लागली. हा संबंध प्रवास अनेक दुःखद आणि रंजक घटनांनी भरलेला असाच. या प्रवासाचाच अस्वस्थ करणारा लेखाजोखा म्हणजेच वादळवारा.