Valan Advalan | वळण आडवळण

Valan Advalan | वळण आडवळण
या कथासंग्रहांतून मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांना त्यांनी प्रत्ययकारीपणे शब्दरूप दिले आहे; माणसांच्या स्वभावातील विसंगती, विरोध, तिरकसपणा, बेरकीपणा, भाबडेपणा, बावळटपणा ह्या स्वभावछटा सुखठणकरांनी बारकाईने टिपल्या आहेत. गमतीदार-खेळकर संवादांची निर्मिती, नाट्यपूर्ण घटनांचा आविष्कार आणि धक्कातंत्राचा अवलंब ही त्यांच्या कथालेखनाची वैशिष्ट्ये आहेत.त्यांच्या 'वळण-आडवळण' या संग्रह्यामध्ये ... अर्थिक सुबत्तेतून वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या, स्त्रियांची श्रद्धाशीलता, त्यांची महत्त्वाकांक्षी आणि पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती, विवाहोत्सुक युवक-युवतींच्या मार्गातील अडचणी, नोकरदार पुरुषांची कुटुंबात आणि समाजात होणारी कोंडी, स्त्रियांची मॉडेलिंगची हौस, राजकारणाच्या स्पर्धेतील नेत्याचा अपेक्षाभंग इत्यादी जीवनसन्मुख विषयांवरील सुधीर सुखठणकरांचे विनोदी शैलीतील हे कथालेखन कसदार आहे.