Vanat... Janat | वनात... जनात

Vanat... Janat | वनात... जनात
अनिल अवचट यांचं नाव एक अवलिया म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. डॉक्टरकीपासून अंधश्रद्धाविरोधी आंदोलनांपर्यंत आणि ओरिगामीपासून बासरीवादनापर्यंत अनेक क्षेत्रांत त्यांनी केवळ कुतुहलापोटी संचार केला आहे. याच कुतुहलातून घराजवळच्या टेकडी परिसरात फिरायला जाताना त्यांनी तिथल्या झाडांशी, वेलींशी, पायवाटांशी मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली. तिथल्या दगडधोंड्यांना आणि झाडाझुडपांना त्यांनी शब्द आणि संवाद दिले आणि त्यातून एकातून एक अशा अनेक 'गोष्टी' उलगडत गेल्या. अशाच ५० गोष्टींचा हा संग्रह 'वनात ... जनात' या नावानं प्रसिद्ध झाला आहे. हे सारं अर्थातच फॅण्टसीच्या पातळीवरचं आहे आणि त्यामुळेच या गोष्टी प्रामुख्यानं लहान मुलांसाठी आहेत. पण मोठ्यांनाही त्या तितक्याच आनंद देऊ शकतात.