Vandevata | वनदेवता

V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Vandevata ( वनदेवता ) by V. S. Khandekar ( वि. स. खांडेकर )

Vandevata | वनदेवता

About The Book
Book Details
Book Reviews

वि. स. खांडेकरांच्या पंच्याहत्तर रूपककथांचा हा आणखी एक कथासंग्रह `कलिका`, `मृगजळातील कळ्या` व `सोनेरी सावल्या` या आधीच्या पुस्तकांचं हे नवं भावंड आहे. रूपककथा हा गद्य स्वरूपात प्रकट झालेला अत्यंत तरल असा काव्याविष्कार असतो. मोजक्या व नेमक्या शब्दांच्या साहाय्यानं वातावरणनिर्मिती करावयाची, वेचक परंतु चमत्कृतिजनक अशा कल्पनांनी सौंदर्य खुलवायचं आणि हे साधित असतानाच विचार आणि भावना यांना आवाहन करून वाचकाला खर्याखुर्या जीवनाचा आणि जीवनमूल्यांचा साक्षात्कार उत्कटतेनं घडवायचा, हा रूपककथेचा मूलस्त्रोत असतो. अन्योक्तीसारखी भासणार्या रूपककथेची आत्मशक्ती असीम असते. तिचं सामर्थ्य सूचकतेनं; परंतु अचूक रीतीनं केलेल्या सत्यदर्शनात आहे. जगाच्या आणि समाजाच्या तोंडावरचे स्वार्थलंपटतेचे मुखवटे अंगभूत कौशल्यानं दूर करण्याचा प्रयत्न रूपककथा करीत असते. त्यामुळं अनेकदा ती तत्त्वकथाच वाटते. खांडेकरांचा म्हणून जो एक विशिष्ट वाचकवर्ग आहे, त्याला हा संग्रह निश्चितपणे आवडेल; कारण खांडेकरांची सर्वच लेखनवौशिष्ट्यं या कथांतून प्रकर्षानं आढळून येतात.

ISBN: 978-8-17-161690-9
Author Name: V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 214
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products