Vanshvruksha | वंशवृक्ष

Vanshvruksha | वंशवृक्ष
पांढरपेशा सुशिक्षित समाजातील सुखदु:खांचे चित्रण या कादंबरीत आहे. कात्यायनी, डॉ. सदाशिवराव, प्रा. राज या मुख्य व्यक्ती महाविद्यालयातील उच्चशिक्षित प्राध्यापक असून करुणा ही सुस्वरूप, सुविद्य तरुणी आहे. या चारही व्यक्ती आधुनिक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहतात.वंशवृक्ष’मध्ये श्रोत्री घराण्याच्या काही पिढ्यांचे ऐश्वर्य आणि औदार्य, अभिमान आणि अस्मिता साकार झाली आहे. एका अर्थी ‘वंशवृक्ष’ हा श्रोत्री घराण्याचा इतिहासही आहे. कर्नाटकमधील नंजनगुडचे श्रोत्री सुयोग्य वारसाच्या अभावी आपल्या अगणित संपत्तीचे दान करून संन्यास घेतात हा कादंबरीचा शेवट प्रारंभीच्या अपरंपार दु:खाच्या गडद पार्श्वभूमीवर काहीसा मनोज्ञ वाटतो. तात्पर्य, श्रोत्री घराण्याचा हा वंशवृक्ष प्रस्तुत लेखकाने प्राय: ताकदीने उभा केला आहे यात संशय नाही.