Vapu 85 | वपु ८५

Vapu 85 | वपु ८५
वपुंची कथा ही जन्मजात वैशिष्ठ घेऊन आली आहे. तिनं परंपरेला सोडलं नाही अणि नवतेला अव्हेरले नाही. मराठी कथेच्या इतिहासात जे जे प्रवाह आले त्या प्रवाहातील चमकती वैशिष्ठे वपुंच्या कथेत आढळतात. हरिभाऊ आपट्यांचे कथन कौशल्य, असलेली मानवी मने उकलणारी पण बोजड मनोविश्लेषणात्मक नाही. अशी वपुंची कथा वाटते. ती खास संसारकथा आहे आणि ती ही मध्यमवर्गाची. ही मध्यमवर्गीय माणसे दु:खी आहेत.सुखी आहेत सुखदु:खमिश्रित आहेत. पण संसाराशी ऐक्य सांधणारी आहेत. ती संसारात राहूनही स्वत:चे घर हरवून बसतात. आणि त्यांच्या कथा मात्र रसिकांच्या मनात घर करुन राहतात. वपुंच्या संसारकथा पुन्हा पुन्हा ऐकाव्याश्या,वाचाव्याश्या वाटतात. कारण त्या तडजोडवादी आहेत. आणि संवादी आहेत कथा वाचकांच्या मनात आपुलकी निर्माण करते. 'बॉनसाय’ या कथेतील चित्रे आपल्याला वेगळे वाटतात. खुरटलेल्या, एकांगी, स्वयंकेंद्रित व्यक्तिचं हे चित्र मनाची पकड घेत. रसिकांचे अंत:करण ओढून घेणारी, मने जिंकणारी अशी ही वपुंची कथा आहे. या संग्रहातील कथा ही सर्व वैशिष्ठ्ये घेऊन अवतरल्या आहेत.