Varasa | वारसा

Varasa | वारसा
सुप्रसिद्ध भ्रमंती लेखिका डॉ. मीना प्रभु यांच्या जग प्रवासाच्या मालिकेनंतर त्यांच्याच जीवन प्रवासाचे वर्णन “वारसा” ह्या आत्मचरित्रपर कादंबरी मध्ये मांडले आहे. यामध्ये सुमारे १२५ वर्षांपूर्वीच्या दरिद्री ब्राम्हण कुटुंबावर, विशेषतः त्यातल्या स्त्रियांवर कोसळलेल्या आपत्ती, रीतिरिवाज, शिक्षण , त्याकाळची कट्टर समाजव्यवस्था, तिच्यामुळे भोगावे लागलेले अपमान आणि हालअपेष्टा, अपमृत्यूनं झालेली होरपळ, दुःखाच्या जाड लेपातून चमकून जाणारी क्षणिक सुखाची चंदेरी लकेर पेरणारे सण- समारंभ, या सगळ्यांमुळे जिवाला चटका लावणारी, गतिमान तरीहि लालित्यपूर्ण अशी ही “वारसा” कादंबरी वाचकाला ‘आरसा’ ठरेल.