Vartanvhya Zalya Katha | वार्तांच्या झाल्या कथा

Rajeev Sabade | राजीव साबडे
Regular price Rs. 446.00
Sale price Rs. 446.00 Regular price Rs. 495.00
Unit price
Vartanvhya Zalya Katha ( वार्तांच्या झाल्या कथा ) by Rajeev Sabade ( राजीव साबडे )

Vartanvhya Zalya Katha | वार्तांच्या झाल्या कथा

About The Book
Book Details
Book Reviews

मुद्रित माध्यमांचा पूर्ण दबदबा असतानाच्या काळात ३४ वर्षे पत्रकारिता केलेल्या राजीव सावडे यांनी स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरापर्यंत अनेक घटना, घडामोडींचं प्रत्यक्षदर्शी वार्तांकन केलं. अनेक मोठ्या राजकारणी नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. देश हादरवणाऱ्या अनेक घटना, प्रसंगांचे भीषण परिणाम त्यांनी पाहिले, अनुभवले आणि वार्ताकित केले. पूर्वी केलेल्या आपल्या या वातकिनाच्या संदर्भाना ललित लिखाणाची जोड देऊन त्यांनी केलेल्या लेखांच्या मांडणीमुळे वाचताना ते प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात; मग ते पुण्यात घडलेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड असो, राजीव गांधींची हत्या असो, दिल्लीमधील शिखांचं हत्याकांड असो की पोलंडमधील औशवित्झच्या छळ छावणीची भेट असो… साबडे ही सर्व वर्णनं इतकी जिवंत करतात की, काही काळापूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली ती बातमी आता कथेसमान वाटू लागते. पुस्तकातील इतर लेख जसं की, पुण्याच्या विकासामधील बावाजींचं योगदान, टेल्को आणि पुण्याचं घनिष्ठ नातं, सोनेरी काळ अनुभवलेला रजनीश आश्रम आणि त्याची उत्तरती कळा, अटल बिहारी वाजपेयींसोबत अनुभवलेले मौलिक क्षण असे सर्वच लेख मनाला स्पर्शन जातात आणि तो काळ डोळ्यासमोर उभा करतात. सत्य-असत्याशी मन केले ग्राही, मानियले नाही बहुमता या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात त्यांनी अनेकांना न रुचणारं आपलं कर्तव्यकठोर मतप्रदर्शनही केलं आहे. या कथा एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. अनेकांगी वार्ताकनातून निर्माण झालेल्या गोष्टीरूपी बातम्या अर्थात… वार्तांच्या झाल्या कथा!

ISBN: 978-9-38-945858-9
Author Name: Rajeev Sabade | राजीव साबडे
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 315
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products