Varul Puran | वारूळ पुराण

Varul Puran | वारूळ पुराण
२०१० साली विल्सन यांनी लिहिलेली अँटहिल ही कादंबरी बाळबोध, सरधोपट आहे. पुस्तक अनेक पातळ्यांवर वावरत पर्यावरणाकडे पाहण्याची एक वेगळीच मर्मदृष्टी पुरवते. अँटहिल ही कादंबरी नेमकी काय आहे? त्याचं कथानक काय? कादंबरीची रचना कशी आहे? हे सगळं सांगण्यापेक्षा ती प्रत्यक्ष वाचायलाच हवी. जगातल्या सर्वात थोर कीटकशास्त्रज्ञानं ती लिहिली आहे. त्यात मुंग्यांच्या वारूळांच्या अभ्यासातून उभारलेली जीवसृष्टी आहे. त्याचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांची ती कहाणी आहे आणि त्यातून मानवाला या निसर्गात त्याची जागा दाखवून देणारी आहे. माधव गाडगीळ, नंदा खरे या ज्येष्ठ विचारी लेखकांनी याचा अनुवाद करून साकारले 'वारूळ पुराण'.