Vashat Ani Itar Katha | वशाट आणि इतर कथा

Suhas Bartakke | सुहास बारटक्के
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Vashat Ani Itar Katha ( वशाट आणि इतर कथा ) by Suhas Bartakke ( सुहास बारटक्के )

Vashat Ani Itar Katha | वशाट आणि इतर कथा

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्या रोजच्या आयुष्यात भावनांचं खमंग मसालेदार मिश्रण असतं… एखादा दिवस रागाचा असतो तर एखादा छानश्या हास्याचा, एखादा नुसताच आठवणींचा आणि एखादा अनाकलनीय भितींचा… या सगळ्या मिश्रभावना आपलं जीवन विविधरंगी बनवत असतात. अशा विविध भावनांची खमंग फोडणी असलेला खुसखुशीत कथासंग्रह सुहास बारटक्के खास वाचकांसाठी घेऊन आले आहेत. यातल्या काही कथा मनसोक्त हसवतात, काही विचारप्रवृत्त करतात, काही कथा वाचून पाठीच्या कण्यातून भीतीची शिरशिरी दौडत जाते, तर काही व्यक्तिरेखात्मक लेख अनोख्या व्यक्तिंशी, प्रसंगांशी भेट घडवून देतात. बारटक्के यांना अनेक वर्षांचा अध्यापनाचा, पत्रकारितेचा आणि लेखनाचा अनुभव आहे. त्यांच्या लेखनातून हे अनुभव समर्थपणे डोकावताना दिसतात. "‘चिनी कम’ ‘नोटबंदीचा दणका’सारख्या नर्मविनोदी कथा मनाला गुदगुल्या करत हसवतात तर ‘उपाध्येंचा अहंकार’ ‘खिचडी’ आणि ‘वशाट’ सारखी शीर्षक कथा मनाला खोल स्पर्शन जातात. या कथांमुळे वाचकाला वेगळी अनुभूती मिळत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या विविध ढंगांच्या कथांचा संग्रह…"

ISBN: 978-9-38-945869-5
Author Name: Suhas Bartakke | सुहास बारटक्के
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 98
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products