Vata Durg Bhramanachya : Satara Jilyatil Kille | वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्यातील किल्ले

Vata Durg Bhramanachya : Satara Jilyatil Kille | वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्यातील किल्ले
आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांची मोठी ऐतिहासिक परंपराच आढळते. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधले किल्ले ट्रेकर्ससहित सर्वांनाच खुणावत असतात. छत्रपती शाहू महाराजांची राजधानी असणार्या सातारा जिल्ह्यातही अनवट आणि प्रसिद्ध असे अनेक किल्ले आहेत. या पुस्तकामधून त्या किल्ल्यांचा इतिहास, त्या किल्ल्यांचे ‘विशेष’ असे वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे किल्ल्यांची सर्वंकष माहिती स्थलवर्णनासह लेखकाने वाचकांसमोर उलगडली आहे. प्रतापगड , कमळगड, वासोटा,दातेगड सज्जनगड अजिंक्यतारा , वर्धनगड संतोषगड , भूषणगड , नांदगिरी ऊर्फ कल्याणगड अशा अनेक किल्यांची ओळख या पुस्तकातुन नकाशे आणि चित्र यांच्या माध्यमातून लेखक आपल्याला करून देतात.