Vedanecha Gana | वेदनेचं गाणं

Vedanecha Gana | वेदनेचं गाणं
एक माणूस दुसऱ्याला फक्त माणूस म्हणून ओळखत नाही. तो त्याचा धर्म ओळखतो, जात ओळखतो, आर्थिक स्तर ओळखतो, शिक्षण ओळखतो. या सर्वांपलीकडे जाऊन माणसाला फक्त माणूस म्हणून ओळखायची संवेदनशीलता फार कमी जणांकडे असते. संझगिरींच्या लेखणीने विधायक म्हणावं असं वळण घेतलं आहे आणि तसं करताना त्यांच्या सहजसोप्या, संवादशील शैलीला धक्का पोहोचलेला नाही. म्हणून असं म्हणावंसं वाटतं की या पुस्तकाच्या आतली पानं अस्सल संझगिरींचं दर्शन घडविणारी आहेत. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची मूल्यं, त्यांच्या चिंता, त्यांची बांधीलकी आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या थरकाप उडवणाऱ्या अनुभवातून त्यांनी टाकलेली शहाणपणाची पावलं हे सगळं इथे आहे. रंजनाबरोबर डोक्याला चालना देणारा असा हा संग्रह आहे.