Vedh Ahilyabaincha | वेध अहिल्याबाईंचा

Vedh Ahilyabaincha | वेध अहिल्याबाईंचा
अहिल्याबाई होळकर हे विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व आहे. ती एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ महाराणी होती. कर्मयोगिनी आणि राजयोगिनी होती. आपले राज्य शिवार्पण केलेली शिवयोगिनी होती. प्रजाजनांची लोकमाता होती. अहिल्याबाईंची कारकीर्द ही इतिहासाच्या पानांवरील एक तेजस्वी यशोगाथा आहे. अहिल्याबाई हे समर्पित, कल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे. राजनीतीला समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची जोड देऊन त्यांनी भारतीय परंपरेत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. अहिल्याबाईंच्या विविध अनोख्या गुणांचा आणि त्यांच्या विश्वात्मक विचारधारेतील विविध पैलूंचा आविष्कार या ग्रंथात चिकित्सकपणे आणि समर्थपणे मांडला आहे. आहिल्याबाईंच्या कारकिर्दीतील इतिहासाची ही सोनेरी पाने म्हणजे त्यांच्या अनेकांगी कर्तृत्वाचा लखलखता आलेख आहे. त्यांच्या भारतवर्षातील चारी दिशांना केलेल्या अभूतपूर्व कार्याचा हा ऎतिहासिक दस्तावेज आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे आणि लोककल्याणकारी कार्याचे पैलू पुन्हा पुन्हा वाचावे, अभ्यासावे, स्मरणात ठेवावे आणि अनुसरावे, असे आहेत.