Vedh Vartamanacha | वेध वर्तमानाचा

Vedh Vartamanacha | वेध वर्तमानाचा
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झालेल्या समता, व्यक्तीस्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक व आर्थिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आणि संधीची समानता या मुल्यांवर आधारलेल्या राज्यघटनेचा भारताने स्वीकार केला. विविध धर्म, भाषा, प्रदेश इ. बाबत जगात अन्य कोणत्याही देशाच्या वाट्याला न आलेली ‘विविधता' ही भारताच्या, सुमारे पाच हजार वर्षांच्या सर्वसमावेशक आणि ‘व्यामिश्र' संस्कृती भारताच्या राष्ट्रवादाचा पाया आहे. भारत हे केवळ ‘राजकीय संघराज्य नाही; तर ते ‘सामाजिक आणि सांस्कृतिक संघराज्य आहे. दुस-या जागतिक महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांशी तुलना करता वरील वैशिष्ट्यांमुळेच भारताचे वेगळेपण उठून दिसते. आणि गेल्या ६०-७० वर्षात जगाच्या वर उल्लेखलेल्या व इतरही भागातील अनेक देशांचे विभाजन झाले आणि काही तर कोसळून पडले, तरीही भारताचे ऐक्य आणि एकात्मता टिकून राहिली, ती या वेगळेपणामुळेच. त्यामुळे, हे वेगळेपण जोपासणे आणि ते दृढ करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.