Veleche Vyavsthapan | वेळेचे व्यवस्थापन

Veleche Vyavsthapan | वेळेचे व्यवस्थापन
मोठे झाल्यावर काय करायचे हे आपण लहानपणी ठरवीत असलो तरी पुढे ते होतेच असे नाही. कारण त्यादृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यासाठी आवर्जून प्रयन्त केले जात नाहीत. तसेच यश मिळविण्यासाठी कष्ट, मेहनत, योग्य नियोजन, होत नाही. "वेळच मिळत नही ही लटकी सबब बहुतेक जण सांगतात. पण वेळेचे योग्य नियोजन केले कामाचे वेळापत्रक आखले तर यश दूर नसते हा कानमंत्र दिला आहे प्रसाद ढापरे यांनी 'वेळेचे व्यवस्थापन'मधून. शून्य मिनिटाचे महत्व आदर्श वेळापत्रक वेळेची गुंतवणूक कामाचा प्राधान्यक्रम ठरविणे हे आवश्यक आहे हे यातून संगितले आहे. वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे याचे धडे यात दिले आहेत. त्यामुळे जीवनात काय व कसा बदल होऊ शकतो हे यातून कळते."